कुणास ठाऊक कसे लिहितो,
तिच्या ओठांचे ठसे लिहितो
जमत नाही लिहिण्या मला,
फार नाही जरासे लिहितो
श्वास घेतो अन श्वास सोडतो
काही रातीचे उसासे लिहितो
वेड्यासारखं करतो म्हणतात,
झालेले रोजचे हसे लिहितो
आटोळ्याला टांगलेला फास
अन ढिले पडले वासे लिहितो
प्रेम,विरह समतोल साधून
थोडे नकोसे,हवेसे लिहितो
वार करशील,ठार करशील
जन्मून जशाच तसे लिहितो
घोषणांचा जेव्हा बाजार उठतो,
त्यांचेच भरलेले खिसे लिहितो
रिकाम्या घागरीने हिंडणारे पाय
अन दुष्काळी कोरडे घसे लिहितो
.
✍️बा.ल ऋषि (gavran_tadka_official)
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवा