भल्या पहाटे कुरतडले शब्द,
हात मारून काही चिरडले शब्द
काना, मात्रा, वेलांटी तोडली,
भासवले असे की घडवले शब्द
चोरी गेल्या ओळी म्हणाल्या
बघ तुझे किती भरडले शब्द
चांगल लिहितो म्हणत ते होते,
वाचले पुढ्यात मग नडले शब्द
काय होता ओ दोष ओळींचा ?
माझेच मी आता खोडले शब्द
कमेंट करून म्हणालो इतकंच
व्वा व्वा कमाल..आवडले शब्द !
✍️बा.ल ऋषि (gavran_tadka_official)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा