जसे तू मला मी तुला सारखे पाहिजे,
जिद्दी आपण सैनिकां सारखे पाहिजे
मरतात लोक रोज त्या प्लॅस्टिकमध्ये,
कफन कसे.. तिरंग्या सारखे पाहिजे
जर गेलोच गावा मिळाली रजा तर,
एक सलाम सारखे सारखे पाहिजे
ते येतील तुझ्या रे अंगावर चालून,
बोट ट्रिगरवर तुझे सारखे पाहिजे
पाठीवर जगाच्या कैक होतील युद्ध,
पण विजय कारगिल सारखे पाहिजे !
.
✍️बा.ल ऋषि
.
इंस्टा/@gavran_tadka_official
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा