मुस्कटदाबी झाली अन
भांबावलेल्या मनाने
पानावर अविरत रेघोट्या मारण्यास सुरुवात केली
रक्त सांडत होतं,
जखमेसह कपाळावरल्या रेषांच मिलन होत होतं,
चेहरा विव्हळत होता.
अकस्मात मृत्यू येईल म्हणता म्हणता
आज स्वतःच स्वतःचा फास लटकावून ठेवला,
फासाच्या आधी ब्लिडिंगमुळेच मरणाने
आलिंगन द्यावं अन मोकळं करावं एकदाच, इतकंच..!
फक्त इतकंच...वाटत असताना
शाई संपली
बट्ट्याबोळ..
शोधाशोध सुरू झाली,
डोळ्यांवर अंधार आला
चाचपडू लागलो,
शोधू लागलो...पण !
पण.. शाई सुद्धा सोडून गेली होती मला, अर्ध्यावरच !
तिला कदाचित 'ती' भेटलेली असावी,
भेंचोद,आयच्या गावात,भोकात गेलं सगळं
"ब्लेड पानांन कुठं मेलो मी..?"
"फिस्कटल रे सगळं"
मंगटातल्या धमण्यांतून येणार रक्त
रिफिल मध्ये भरलं
आणि लिहिली रक्तभंबाळ झालेली,
सुटकेच्या निःश्वासास
भेटण्याची आर्त इच्छा असलेली
एक धगधगती रक्तरंजित अंतिम "कविता" !
.
✍️बा.ल ऋषि
insta@gavran_tadka_official
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा