कुठलंच प्लॅटफॉर्म चांगलं किंवा वाईट नसतं.वाईट असते ती त्यावर असलेली प्रवृत्ती.आणि चांगला असतो त्या प्लॅटफॉर्म चा योग्य वापर.चांगलं,वाईट च्या सो कॉल्ड आरोप प्रत्यारोपांचा नीट विचार केला असता.. येवढं नक्की लक्षात येत की आपण सगळे चुतीया आहोत.कुणीतरी काहीतरी व्हिडीओ पोस्ट केला.त्याला उत्तर म्हणून अजून कुणीतरी काहीतरी पोस्ट केलं.त्यावर चर्चांचे ग्रुप तयार झाले.असाच एखादा ग्रुप कोरोनाच्या संकटात सापडलेल्या गरजवंताना मदत मिळवून देण्यासाठी तयार झाला असता तर आंनद वाटला असता.दमलेल्या लहानश्या पावलांनी बॅग वर विक्षिप्त पडून केलेल्या प्रवासाच्या दृश्यांनी आमचं मन विचलित होत नाही. विनाकारण खर्च होत असलेला डेटा आणि अयोग्य ठिकाणी सळसळणार रक्त यांचा मिलाप योग्य ठिकाणी झाला असता तर कुणाचंतरी पोट भरल्याचा आंनद मिळाला असता.असो, एकाने शिव्या घातल्या दुसऱ्यानेही घातल्या.आया बहिणींचा उद्धार झाला.आपल्याला मजा आली.इथपर्यंत सगळं व्यवस्थित आणि नेहमीचंच.त्यामुळे शिव्यांवर भाष्य करून सभ्यतेचा जप मी नाही करत बसणार.पण कुणाला आणि कशाला महत्व द्यावं हे कळण्याइतपत तरी आपण सुज्ञ आहोत ही जाणीव नाहीशी झालीये.
चार दिवसांपासून सोशल माध्यमांत सुरू असलेला निरर्थक दंगा, डिबेट्स.कोणी कोणाला कसे आणि किती अश्व लावले याच्या रेटिंग्स,सध्यस्थीतीबाबत नसलेलं गांभीर्य,नको त्या गोष्टींना दिलेलं प्रोत्साहन त्यात अजून चार लोकांच मत परिवर्तन,यू ट्यूब टिकटॉक ची थट्टा..आपल्याला काय झा#..?
.
सांजेसह विचार करत असताना आपण किती येड्या भोकाचे आहोत हे कळलं!(आपण म्हंटल मी)
.
✍️बा.ल ऋषि
इंस्टा/gavran_tadka_official
अगदी खरं आहे.. 👍🏻
उत्तर द्याहटवा